जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत पण…

0
15

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही सभाचं आयोजन करत आहेत. तर, धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
“जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंचे नावही घेण्यास तयार नाही,” असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी जरांगे-पाटलांना लक्ष्य केले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते.
“काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या आहेत.ही पिलावळ आरक्षण मागत आहे पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत अथवा बाबासाहेबांचे नावंही घेण्यास तयार नाही मात्र यांना आरक्षण पाहिजे असं कसं चालेल?” असा सवाल गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला.
यावर जरांगे-पाटील यांनीही भाष्य केलं आहे. “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. ते काहीही बोलतात. त्यांनी पाहिलं नसेल, पण मी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतो. महाडला देखील मी जाऊन आलोय,” असे जरांगे-पाटलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here