जळगावच्या २७ रेशन दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त

0
10

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील २७ स्वस्त धान्य दुकानांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यात सर्वाधिक दुकाने जामनेरची आहेत. दरम्यान, आणखी ११ दुकानांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे मानांकनाचा हा आकडा वाढण्याची शक्यता
आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ३७४ दुकानांची आयएसओ मानांकनासाठी निवड केली होती. त्यानुसार दि.११ ऑक्टोबर रोजी १८५ स्वस्त धान्य दुकानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दि.९ नोव्हेंबर रोजी आयएसओ प्रमाणिकरणासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आले होते. त्यातील २७ दुकानांना दि.२३ नोव्हेंबर रोजी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.
दरम्यान, दि.२२ नोव्हेंबर रोजी जळगाव (१), धरणगाव (५), चोपडा (५) या तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या दुकानांनाही मानांकन मिळेल, असा विश्वास सुत्रांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here