पंढरपूर : वृत्तसंस्था
कार्तिकी एकादशीअसून यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकिय महापूजा संपन्न झाली. तसेच यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. घुगे दांपत्य गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करतायत. यंदा त्यांना महापूजेचा मान मिळाला.
अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच पंढरपूरात दाखल झाले होते. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये पूजा करण्यात आली. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.