जळगाव : प्रतिनिधी
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांना जिल्हाबंदीचे आवाहन केले होते. ते आवाहन ना.महाजन यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी स्वीकारुन
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर ना. गिरीश महाजन यांचा दुग्धाभिषेक केला. यावेळी भूषण भोळे, मुविकोरज कोल्हे, राहुल पाटील, रुपेश ठाकूर, यशवंत पाटील, मुकेश पाटील, तुषार चौधरी, मंगेश पाटील, चैतन्य कोल्हे, अमेय राणे, प्रशांत चौधरी, कल्पेश कासार, योगेश चौधरी, योगेश पाटील, शाम पाटील, आनंद, डॉ. क्षितिज भालेराव यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
