मुंबई : प्रतिनिधी
ग्लेन मॅक्सवेलने ऐतिहासिक द्विशतक झळकावले. हा सामना संपल्यवर त्याने आपला राग टीकाकारांवर काढल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्याने ही खंत बोलून दाखवली.
ग्लेन मॅक्सवेलने षटकारासह द्विशतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. वर्ल्ड कपमध्ये आता सर्वाधिक धावा या मॅक्सवेलच्या नावावर असतील. अफगाणिस्तानचा संघ त्याच्यापुढे बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले.
मॅक्सवेल म्हणाला की, ऑस्ट्रेलिया पहिले दोन सामने खेळला त्यामध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. या दोन पराभवानंतर बऱ्याच जणांनी आमच्यावर टीका केली होती. बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं होतं. पण ही टीका करण्यात त्यांनी फार घाई केली. कारण त्यानंतर सहा सामन्यांत आम्ही अशी कामगिरी केली की थेट सेमी फायनलमध्ये दाखल झालो. आज आम्ही जो सामना जिंकला त्यामध्ये या टीकाकारांना उत्तर मिळाले असेल. कोणावरही एवढ्या लवकर टीका करू नये, हे यामधून पाहायला मिळाले आहे. या एका विजयाने बरेच काही बदलले आहे. या एका विजयाने आम्ही सेमी फायनलमध्ये दाखल झालो आहोत. ही गोष्ट नक्कीच सुखावणारी आहे. अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहायचे मी ठरवले होते. अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना यश मिळाले नाही.