जळगाव : प्रतिनिधी
नाशिक येथे क्रीड़ा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा शुटिंग स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभागीय रायफल शुटिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत सिमरा खानने ४०० पैकी ३५९ गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकावले व राज्य स्पर्धेसाठी पात्र झाली.सिमरा खान ही जामनेरचे तालुका क्रीडा संयोजक प्रा. डॉ.आसिफ खानयांची सुकन्या आहे. सिमरा खानला दिलीप गवळी, नेहा सप्ते, प्रियंका पटायत व प्रकाश गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.जामनेर तालुक्याचे आमदार व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सिमराखानच्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.