जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अज्ञात चोरट्यांनी फुले मार्केटच्या समोरून १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केल्याची घटना १० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ येथील राहणारे राधेश्याम कैलास पांडे (वय-२२) हे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद रोड वरील नवजीवन कलेक्शन समोरील असलेल्या मोकळ्या जागेवर उभे असताना त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि सोबत असलेल्या चंद्रकांत भीमराव पाटील यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल संशयित आरोपी विजय गुलाबराव पवार याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विजय पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकम करीत आहे.