मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संंपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांंनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले.“जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये,”असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले तसेच सध्याच्या परिस्थितीला उपोषण करणाऱ्यांंना दोष देता येणार नाही,असेही नमूद केले.
शरद पवार म्हणाले,“मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत.त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणं झालं हे मला माहिती नाही.वर्तमानपत्रावरून जरांगेंनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला.त्यात आणखी काही वाढ झाली.”
“सरकारने मनोज जरांगेंना दिलेल्या वेळेत आरक्षणावर निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले होते मात्र,ते आश्वासन पूर्ण झालेले दिसत नाही. जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांंना दोष देता येणार नाही,” असं मत शरद पवार यांंनी व्यक्त केले.