गाडी फोडण्याची शिक्षा कमी, सदावर्तेंना संपवायला हवं होतं

0
41

नागपूर : वृत्तसंस्था

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी एकेरी उल्लेख करत वकील गुणरत्न सदावर्तेे यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.“गुणरत्न सदावर्तेेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली. त्यांना संपवायला हवं होतंं”, असे मत संजय गायकवाडांनी व्यक्त केले.ते गुरुवारी (२६ ऑक्टोबर) मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर माध्यमांशी बोलत होते.
संजय गायकवाड म्हणाले,“गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवाले गेले. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसं काय मराठा आरक्षणामुळे यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतंं.
“गुणरत्न सदावर्ते संपले असते तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता.ज्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झाले. सदावर्तेंची चांगली व्यवस्था करायला हवी होती,असे मत संजय गायकवाड यांनी व्यक्त
केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here