Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»निवडणूक आयोगाने राजकुमार रावची केली ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती
    राष्ट्रीय

    निवडणूक आयोगाने राजकुमार रावची केली ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार रावची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी त्याची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राजकुमार राववर खास जबाबदारी टाकण्याचे ठरवले आहे. २५ ऑक्टोबरला याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
    भारतातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच ही घोषणा केली. आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करताना अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. राजकुमार राव हा त्याच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देत असतो. त्याचप्रमाणे तो ही नवी जबाबादारीही चोखपणे पार पाडेल असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो आहे.
    विधानसभेची निवडणूक छत्तीगडमध्ये ७ ते १७ नोव्हेंबरच्या दरम्यान दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी १७ आणि ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला मतदान होणार होते पण ते आता २५ नोव्हेंबरला होणार आहे आणि ३ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
    मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, छत्तीसगड,मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या विधानसभा निवडणुका महत्त्वाचे काम करणार
    आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.