‘तेज’ चक्रीवादळामुळे काही राज्यात मुसळधार पावसाची शक्य

0
42

नागपूर : वृत्तसंस्था

मध्य बंंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘तेज’ असे नाव देण्यात आले आहे. पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
‘तेज’ चक्रीवादळ रविवारी दुपारनंतर अतिशय तीव्र झाले आहे.हे चक्रीवादळ अधिक सक्रिय झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर १२५-१३५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग १५० किमीपर्यंत वाढू शकतो.त्यामुळे केरळ, तामिळनाडूमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्येही पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे भारतीय तटरक्षक दलाने आंध्र आणि तमिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत. त्यांना तातडीने माघारी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांनी दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहनदेखील केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here