Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पारोळा»नाल्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा बुडून मृत्यू; शेतकरी कुटुंब बचावले
    पारोळा

    नाल्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा बुडून मृत्यू; शेतकरी कुटुंब बचावले

    saimat teamBy saimat teamSeptember 10, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या बांधकामासाठी ठिकठिकाणी खड्डे करण्यात आले आहे. दरम्यान, बैलांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह दोन्ही बैल, माळी कुटुंब खड्ड्यात बुडाले. ही घटना सभोवतालच्या नागरिकांना कळताच माळी कुटुंबा वाचविण्यात यश आले. मात्र, या घटनेत दोघ बैलांच्या मृत्यु झाला आहे.

     

    तालुक्यातील मौजे विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात बोभाट्या नाल्यावर पुल बांधकामासाठी शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या भर शेतरस्त्यात खोलवर खोदकाम करून खड्डे करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी कुठेही सुचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरून वापरणाऱ्यांना कुठलाच अंदाज येत नाही. दिनांक १० सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने सदर खड्ड्यांमध्ये तुंब पाणी भरून रस्त्यावर वाहु लागले. १० सप्टेंबर रोजी विचखेडा येथील शेतकरी बाबुलाल रामा माळी हे आपल्या दैनंदिन नियोजनानुसार कुटुंबासह बैलगाडीवर आपल्या शेतात निघाले. सदर खड्ड्यांचा ठिकाणी बैलांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडी, दोन्ही बैल, माळी आपल्या कुटुंबासह खड्ड्यात बुडाले. सदर ठिकाणी सभोवताली असलेल्या नागरीकांना हा प्रकार कळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत माळी व त्यांच्या कुटुंबियांना कसे बसे करू बाहेर काढले. मात्र दोन्हीही बैलांना बाहेर काढण्यात अपयश आल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

     

    यावेळी बाबुलाल माळी त्यांसह कुटुंब व सदर ठिकाणी उपस्थित सरपंच रविंद्र पानपाटील, सदस्य अमोल पाटील, भरत माळी, नाना माळी, बापु गढरी, वैभव पाटील, हितेंद्र देवरे, गोपाल माळी, हितेश पाटील, शाहरूख शेख, रोहित पाटील, रंजित पाटील व इतर नागरीकांनी यांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेवून झालेला प्रकार सांगितला. याची त्वरीत दखल घेवून आमदार चिमणराव पाटील यांनी तहसिलदार, नही प्रा.लि.चे व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन झालेला प्रकार लक्षात आणुन दिला व सदर प्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही करून माळी यांना तात्काळ झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश दिले व माळी त्यांसोबत उपस्थित नागरीकांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा सुचना देखील केल्या. तसेच सदर प्रकरणी मी आपल्या सोबत असुन माळी यांच्यासह रस्त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मी बारकाईने सदर प्रकरणी लक्ष ठेवुन असल्याचे यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Parola : टायगर स्कूलमध्ये गणितज्ञ रामानुजन जयंतीनिमित्त आठवडाभर गणितीय उपक्रम

    December 23, 2025

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    Parola : पारोळा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.