सरकारने आता युवकांचे परीक्षा शुल्कही परत करावे

0
37

नागपूर : वृत्तसंस्था

काही पदांसाठी कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले, त्याचे शुल्क प्रति परीक्षा एक हजार रुपये घेण्यात आले. काही उमेदवारांनी पाच पदांसाठी पाच अर्ज केले, त्यांच्याकडून पाच हजार घेण्यात आले होते, आता ती रक्कम उमेदवाराला तातडीने परत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विद्यमान सरकारने चपराशी पासून ते अभियंतापर्यंतचे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जी.आर.मध्ये दुरुस्ती केली. ६ सप्टेंबर २०२३ रोजी महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागात दोन हजार, पोलीस विभागात तीन हजार आणि आरोग्य विभागात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी.आर. काढला. जेव्हा ही जाहिरात प्रकाशित झाली. विरोधी पक्षाने यास विरोध केला आणि राज्यभरातील युवक रस्त्यावर आले. त्यामुळे सरकार हादरले आणि अखेर कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here