मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ

0
34

पुणे : प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली. जरांगेंचे भाषण संपत असताना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्याला बोलू देण्याची मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिला.त्यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनोज जरांगेंच्या भाषणानंतर राजगुरूनगरच्या सभेत एका तरुणाने चांगलाच राडा केला.जरांगे भाषण आटोपून स्टेजवर उभे असताना अचानक हा मराठा तरुण स्टेजवर आला. त्याने माइक हातात घेतला. मला बोलू द्या, नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकीच त्याने माइकवरून दिली. तेव्हा पोलिसांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला.जरांगेंनी या संतप्त तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो जरांगेंच्या पायाही पडला मात्र त्याचा हट्ट कायम होता.तो ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याला उचलून स्टेजवरून
नेले.
आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत.हे शांततेचे युद्धच मराठ्यांना न्याय देणार आहे. मराठा आरक्षणासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारची धावपळ सुरू असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. मी एकदा शब्द दिला की, कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगेंची पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती.जरांगे सभेला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुले उधळण्यात आली.
२४ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात शांततेत आंदोलन करु. त्यानंतर भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी सुनिल कावळेंनी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. पुण्यातल्या सभेआधी मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर जात शिवाजी महाराजांना अभिवादन केले तसेच गडावरच्या शिवाईदेवीची आरतीही जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here