जळगाव : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या नगर विकास शाखेतर्फे एक कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी प्रयत्न केले.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कोणतीही अनियमितता आढळून आल्यास त्याच कार्यकारी अभियंता हे स्वतः जबाबदार राहतील तसेच निधी खर्च करण्याची मर्यादा तपासून आवश्यक असल्यास निधी खर्च करण्यास मदत वाढ घेण्याची जबाबदारी देखील कार्यकारी अभियंता यांचीच असणार आहे. मोताळा शहरांमध्ये तयार होणाऱ्या या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या सौंदर्यकरणामुळे शहराचा चेहरा देखील बदलण्यास मदत होईल. स्वच्छ व चांगले शहर दिसण्यासाठी शहरात हे वेगवेगळे बदल करण्यात येत असून यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी पुढाकार घेतला आहेत्यांच्या या पुढाकारातून या कामासाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या रकमेला मान्यता मिळाली आहे.