धक्कादायक : आईची विवाहित मुलासह विहीरीत उडी मारून केली आत्महत्या

0
62

जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे ह्रदय पिळुन टाकणारी घटना घडली आहे. विवाहित मुलासह आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथे काल रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय विवाहित युवकासह त्याच्या आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली . आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .

मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील असुन त्याच्या आईचे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील ( वय ४५ ) आहे. या दोघा माय लेकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. विहीरीतुन पट्टीचे पोहणार्यांनी आधी आईचे प्रेत काढले तर मुलाचे प्रेत नंतर सापडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचे प्रेत शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here