Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव राज्यात प्रथम
    जळगाव

    जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव राज्यात प्रथम

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 13, 2023Updated:October 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हा वार्षिक योजनेंंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी वितरणात जिल्हा राज्यात प्रथम आला आहे.
    प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ खर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत भवन येथे आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच कार्यान्वयीन यंत्रणांचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कामांना अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. अशा कामांना १८ ऑक्टोंबर पर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे. २०२३-२४ अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कार्यवाही पूर्ण करुन २५ लाखांपेक्षा कमी किंमतीची कामे डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणेबाबत निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

    पाळधी येथे पोलिस स्टेशन बांधकामाचा प्रस्ताव
    बैठकीत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत मदर मिल्क बँक तयार करणे, प्रोटीन पावडर इ. प्रस्तावांबाबत चर्चा झाली. पाळधी येथे पोलिस स्टेशन बांधकामाचा प्रस्ताव व महिला व बाल विकास भवन बांधकाम प्रस्ताव ८ दिवसांमध्ये सादर करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना दिल्या.

    मंजुर कामांत बदल करु नये
    एकदा कामे मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कामांमध्ये बदल करु नयेत. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने काही पाठपुरावा आवश्यक असल्यास त्याबाबतही प्रत्यक्ष पाठपुरावा करण्यात येईल. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षातील मंजूर कामांना आवश्यक निधी मागणी पुढील आठवड्यात सादर करावीत याबाबत सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना सूचित करण्यात आले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jamner : जामनेरात अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन

    December 25, 2025

    Annual Function Of BUN Raisoni School : बीयूएन रायसोनी स्कुलच्या वार्षिक सोहळ्यात सर्वांगीण प्रगतीचा उत्सव

    December 25, 2025

    Yaval : मारूळ ते न्हावी रस्त्याची दयनीय अवस्था

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.