जेरुसलेम : वृत्तसंस्था
पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत येणाऱ्या परिसरांवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. इस्रायल सरकारने आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
गाझा पट्टीतून इस्रायलच्या रहिवासी भागांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. यानंतर इस्रायली लष्कराने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क केले.या भोंग्याचे आवाज देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी तेल अविवपर्यंत ऐकू आले.शनिवारी पहाटे झालेली बॉम्बफेक अर्धा तास चालली. इस्रायलचे बचाव दल मॅगन डेविड एडोमने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमध्ये एका इमारतीवर क्षेपणास्त्र पडून ७० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली तर एक २० वर्षीय तरुण किरकोळ जखमी झाला.
