नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वैद्यक आणि भौतिकशास्त्रापाठोपाठ रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या मौंगी जी.बावेंडी, कोलंबिया विद्यापीठाचे लुईस ई. ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल टेक्नोलॉजी या संस्थेत काम करणारे ॲलेक्सी आय. एकिमोव्ह या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जाणार आहे.क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.