Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»केळी पिकाचे नुकसानग्रस्त आणि पुरग्रस्तांना मदत द्या
    जळगाव

    केळी पिकाचे नुकसानग्रस्त आणि पुरग्रस्तांना मदत द्या

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) झाल्याने नुकसान झालेल्यांसह ७८हजार केळी उत्पादक विमाधारकांना आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन रूपी केळीचे पान मुक्ताईनगर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देऊन केळी उत्पादकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी दुपारी केळीची पाने अंगावर लपेटून तसेच डोक्यावर केळीचे घड ठेवत जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे किशोर घटे, संभाजी पाटील, संदीप बेलदार, समाधान पांडे, ज्ञानेश्वर वानखेडे, पिंटू खाटीक, चुडामण पाटील, रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, भय्या पाटील आदी पदाधिकार्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांना भेटत मागण्यांचे निवेदनरूपी केळीचे पान सुपूर्द करीत शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, जळगाव हा केळी उत्पादनात सुप्रसिद्ध जिल्हा आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोगाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शेकडो उत्पादक शेतकऱ्यांवर केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. ढगाळ हवामान कायम राहिल्यास रोगाचा प्रभाव व व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त आहे.
    दरम्यान, मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील ७७ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार विमा कालावधी संपल्यानंतरही विम्याची नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष डॉ.सोनवणे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे जलसमाधी आंदोलनही झाले होते. जिल्ह्यातील८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून, १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीकविम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व उच्च तापमानाची तीन आठवड्यांच्या आत, तसेच चक्रीवादळ, गारपीट, अतिवेगाचे वारे यांची नुकसानभरपाई ४५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. विम्याचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात येऊन दीड महिना उलटूनही आजतागायत शेतकऱ्यांना कोणतीच नुकसानभरपाई मिळालेली नाही, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : पिंप्राळा हुडको प्रभागात मतदानाचा उत्साह; शेवटच्या टप्प्यात लांबच लांब रांगा

    January 15, 2026

    Bhusawal : भुसावळ न्यायालयाबाहेर महिलेकडून गावठी कट्टा जप्त

    January 15, 2026

    Jalgaon : जळगाव बोगस मतदानाच्या आरोपातून तरुणाला मतदान केंद्रावर चोप

    January 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.