जळगाव : प्रतिनिधी
शासकीय आणि निमशासकीय जागामध्ये पन्नास टक्के जागा रिक्त आहेत, या जागा कायमस्वरुपी भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कारण सरकार दिवाळखोरीत गेले आहे. उद्याच्या काळात मंत्रीमंडळही आता कंत्राटी पद्धतीने चालवावे आणि दर महिन्याला नवीन भरती करावी, तसेच कायम स्वरुपी मंत्री मंडळाची पाच आणि तीन वर्षांसाठी गरजच काय? असा सवाल करून एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.या निर्णयाचा फटका हा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.