फारुक शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

0
46

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा व महाराष्ट्र राज्य मानियार बिरादरीचे अध्यक्ष तथा विविध क्रीडा संघटनावर कार्यरत फारुक शेख अब्दुल्ला यांना सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आदिलशहा फारुकी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्हा पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्ल्ड मेमन बिरादरीचे अब्दुल मजिद झकेरिया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे विजय पवार, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, चोपड्याच्या उपसभापती अमिनाबी तडवी, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, सरकारी अभियोक्ता ऍड.कलंत्री व डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.प्रमाणपत्र, शाल व मेडल देऊन फारुख शेख यांना गौरविण्यात आले.
कोरोना काळातील दहावा पुरस्कार
कोरोना या महामारीच्या काळापासून फारुक शेख यांनी आपल्या मानियार बिरादरीमार्फत गोरगरिबांना धान्य तर जळगाव कोविड केअर युनिटतर्फे ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करून वैद्यकीय सेवा पुरविली तसेच मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी म्हणून कोरोनापासून मृत्यू झालेल्यांचा दफनविधी व आवश्यक त्या सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्याबद्दल हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विविध संघटनांनी त्यात जागतिक पातळीवरील, भारतीय पातळीवरील तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील विविध संघटनांनी त्यांना आतापर्यंत दहा पुरस्कार दिलेले आहे.शेख यांच्या गौरवाबद्दल जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी व महाराष्ट्र राज्याची महा मानियार बिरादरीचे पदाधिकारी व सभासदांनी अभिनंदन केले असून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्यांक संघटनेचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here