यावल : प्रतिनीधी
आश्रय फाऊंडेशन यावल रावेर च्या वतीने डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-१९च्या राष्ट्रीय स्तरावरील कोविड-१९ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर या समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल रावेर तालुका स्तरीय असलेल्या आश्रय फाउंडेशनच्या वतीने डॉ. अतुल सरोदे यांच्या सावदा येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला.
खउचठ व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या व देशभरातील ख्यातनाम डॉक्टर आणि वैज्ञानिक यांचा समावेश असलेल्या या समितीत डॉ.अतुल सरोदे यांचा ही समावेश आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानस्पदबाब आहे,या उत्तुंग भरारी बद्दल यावल रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशनतर्फे डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांना सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन त्यांच्या राहत्या घरी त्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी आश्रय फाऊंडेशन पदाधिकारी डॉ.कुंदन फेगडे डॉ.शैलेश खाचणे, डॉ.विलास पाटील, डॉ.पराग पाटील, डॉ.राजेश चौधरी,डॉ.भरत महाजन,डॉ.नितीन महाजन,डॉ दिलीप भटकर, डॉ.अभिजित सरोदे, डॉ.निलेश पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रफुल्ल पाटील, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.गौरव धांडे उपस्थित होते.