पत्रकार गणेश पांढरे यांची शिवसेना जामनेर तालुका प्रवक्तेपदी निवड

0
90

जामनेर ः प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथील विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे यांची जामनेर विधानसभा शिवसेना प्रवक्तापदी साईमतचे पत्रकार गणेश पांढरे यांची निवड करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खा.तथा प्रवक्ता संजय राऊत, जिल्हा संपर्क नेते विलास पारकर यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात पहूर येथील गेल्या ३५ वर्षापासून शिवसेनेची कमान सांभाळणारे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेना विभाग प्रमुख गणेश पांढरे यांची शिवसेना तालुका प्रवक्तापदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, सुकलाल बारी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्‍वजीत पाटील, ऍड. भरत पवार आदी पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here