Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»आमदार मंगेश चव्हाण यांच्या ऑन द स्पॉट कामाची ‘धडाकेबाज’ स्टाईल
    चाळीसगाव

    आमदार मंगेश चव्हाण यांच्या ऑन द स्पॉट कामाची ‘धडाकेबाज’ स्टाईल

    saimat teamBy saimat teamMay 31, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी
    ‘जो मे बोलता हु वो मै करता हु’ असे फिल्मी डायलॉग फक्त सिनेमांमध्ये हिरोच्या तोंडून ऐकायला भारी वाटतात मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव मात्र प्रेक्षकांना येत नाही. त्यात राजकारणी लोकांच्याबाबत तर बोलायलाच नको. मात्र याला अपवाद ठरेल असा अनुभव चाळीसगाव वासियांना वेळोवेळी येत असतो. आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांनी सकाळी मागणी करताच दुपारी निधीचे पत्र देत संध्याकाळीच कामाचे भूमिपूजन करत पुन्हा एकदा आपल्या धडाकेबात स्टाईलचा प्रत्यय चाळीसगाव वासियांना करून दिला आहे.
    झालं काय तर चाळीसगाव शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणार्‍या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे असल्याने सदर रस्ता दुरुस्तीची मागणी सदर शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करत होते. त्यातच मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे व गुरा ढोरांचे त्याचप्रमाणे हातमजुरी करणार्‍या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले होते. हा त्रास सदर शेतकर्‍यांना दर पावसाळ्यात होत असल्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते.
    ही अडचण घेऊन या त्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या प्रमुख प्रतिनिधी सोबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दि.२९ मे रोजी सकाळी भेट घेतली व आपल्या स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. आमदार मंगेशदादा यांनी देखील शेतकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या समजून घेतली व त्यांना विचारले की किती निधी दिला तर हा रस्ता तयार होईल. त्यावर शेतकर्‍यांनी सांगितले की खडीकरण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जवळच उपलब्ध आहे तसेच हे काम आम्ही कुठल्याही आर्थिक दृष्टिकोन ठेवून न करता स्वतः उभे राहून करणार असल्याने शासनाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आणि टिकाऊ काम आम्ही करून घेऊ कारण या रस्त्यावरच आमचे शेतीचे अर्थकारण अवलंबून आहे.
    आमदार मंगेशदादा यांनी देखील शेतकर्‍यांची प्रामाणिक तळमळ बघत आपल्या निधीतून *तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तेव्हड्यावरच न थांबता काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे. शेतीकामांसाठी शेतकर्‍यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे. त्यामुळे निधीचे पत्र दिल्यानंतर त्या कामाला मान्यता मिळण्यासाठी जवळपास एक ते दीड महिना लागेल, काम होईपर्यंत अर्धा पावसाळा निघून जाईल. म्हणून आमदार मंगेशदादा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार विजय चौधरी यांना बोलावून घेत त्यांना सदर कामाची जबाबदारी दिली व सांगितले की तुम्ही आताच दुपारी माझ्या निधीचे ५ लाखांचे पत्र घ्या, तो निधी मंजूर होईल तेव्हा होईल, तुमचा कष्टाचा एक रुपया बुडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो मात्र मला या शेतरस्त्याचे काम आजच संध्याकाळी सुरू झालेल पाहिजे. मी स्वतः संध्याकाळी तेथे नारळ फोडायला येतो.
    आमदार मंगेशदादा यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून उपस्थित शेतकरी देखील भारावले. ठेकेदार चौधरी यांनी देखील आनंदाने ही जबाबदारी स्वीकारत त्याचदिवशी संध्याकाळी कामाला सुरुवात केली.आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील झाले.
    यावेळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक बापू अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अनिल ठाकरे चौधरी, अमोल चौधरी, भाजपा कार्यकर्ते मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभु चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.
    शेतकरी आंदोलन असो की, मध्यरात्री पाठलाग करून लाखोंचा गुटखा पकडणे असो आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपला स्वभाव वेगळा असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता विकासकामांच्या बाबतीत देखील सरकारी काम दहा महिने थांब न म्हणता,द्यायचे तर द्यायचेच, बोललो तर बोललो म्हणत सकाळी मागणी, दुपारी निधीचे पत्र आणि संध्याकाळी कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केल्याने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज स्टाईलची चाळीसगावकराना अनुभूती दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Chalisgaon : वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात पथदिवे बंद तर गटारी तुंबल्या

    December 18, 2025

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सर्रासपणे सुरू

    December 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.