Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»नाशिक जिल्ह्यात करोनाबळींची लपवाछपवी!
    Uncategorized

    नाशिक जिल्ह्यात करोनाबळींची लपवाछपवी!

    saimat teamBy saimat teamMay 29, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक – प्रतिनिधी

    शहरात करोना रुग्णांची संख्या घटत असताना, मृत्युदर मात्र वाढत असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. एप्रिल व मे महिन्यात खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआर पोर्टलवर वेळेत न करता रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सुरू केल्याने दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये शहरात ३९४, तर मे महिन्यात आतापर्यंत ३६५ मृत्यूंची नोंद झाली असून, हा आकडा आणखी वाढणार आहे. दुसरीकडे नाशिकमधील स्मशानभूमीतील आकडा मात्र दीड हजारावर असल्यामुळे आकड्यांची लपवाछपवी होत असल्याचे दिसून येत आहे.

    करोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशकात हाहाकार माजवला. मार्च महिन्यात करोनाचे तब्बल ३० हजार रुग्ण वाढले होते. एप्रिलमध्ये तर दिवसाला तीन ते चार हजार रुग्णांची भर पडत गेली. १ एप्रिलपर्यंत शहरातील करोनाबाधितांचा आकडा एक लाख १६ हजार ५३८ होता. ३० एप्रिलपर्यंत तो एक लाख ९२ हजार ७४१ पर्यंत जाऊन पोहचला होता. या महिन्यातच ७६ हजार २०३ रुग्ण वाढले. मे महिन्यात मात्र करोनाचा जोर ओसरला. २६ मेपर्यंत ३० हजार रुग्ण वाढले आहेत. तीन महिन्यांत सव्वा लाख रुग्णांची शहरात भर पडली. याच काळात शहरातील मृत्युदर मात्र ०.५९ एवढा कमी होती. परंतु, करोनाचा जोर ओसरत असताना शहरातील मृत्युदर झपाट्याने वाढला असून, तो एक टक्क्यांवर गेला आहे. मृत्युदर कमी असल्याचे कारण आता समोर आले आहे. तांत्रिक कारणांमुळे आणि रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे झालेल्या मृत्यूंची नोंदणी वेळेत केली नसल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयांकडून उशिराने आयसीएमआर पोर्टलवर मृतांची नोंदणी केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आयसीएमआर पोर्टलवरील नोंदणीनुसार आतापर्यंत एप्रिल महिन्यात ३९४, तर मे महिन्यात आतापर्यंत ३६५ करोनाबाधितांचा बळी गेल्याची नोंद झाली आहे.

    आकडेवारी अपडेट करण्याचे आदेश

    नियमानुसार आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या मृत्यूचे आकडेच पालिकेला जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहरात अधिक करोनामृत्यू होऊनदेखील पोर्टलवरील आकडेच अधिकृत असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. दुसरीकडे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व रुग्णालयांना तोंडी सूचना देऊन करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे पोर्टलवर टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांकडून दररोज आकडे अपडेट केले जात असल्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे, दुसरीकडे मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. हा आकडा अजूनही अपडेट केला जात असल्याने तो वाढण्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली आहे.

    दोन ठिकाणीच १,७५३ मृत्यूंची नोंद

    महापालिकेच्या दप्तरी सध्या दोन महिन्यात ७५९ करोनाबाधितांच्या मृतांची नोंद असली तरी, शहरातील १७ स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचा आकडा मात्र यापेक्षा दुपटीने जास्त आहे. गेल्या दोन महिन्यांत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग होते. पंचवटी आणि जुने नाशिकमधील दोन स्मशानभूमींमध्ये एप्रिल वे मे या दोन महिन्यांत १,७५३ अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. त्यामुळे करोना मृतांच्या आकडेवारीत मोठा फरक दिसत आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमीत ग्रामीण भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ दोन महिन्यात पालिका हद्दीत ७५९ मृतांचीच नोंद झाल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.

    करोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे मध्यंतरी खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील करोनाने मृत झालेल्या व्यक्तींची नावे आयसीएमआर पोर्टलवर अपडेट केलेली नव्हती. परंतु, आता ही आकडेवारी अपडेट केली जात असल्याने मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

    – डॉ. आवेश पलोड, नोडल अधिकारी, मनपा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.