भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे पुन्हा बोहल्यावर!

0
21

लंडन : वृत्तसंस्था

भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केले आहे. ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रिनासह त्यांनी विवाह केला आहे. हरिश साळवे आणि ट्रिना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हरिश साळवेंच्या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, उज्जवला राऊत यांच्यासह इतर काही प्रतिष्ठितांची उपस्थिती होती.

हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी होते. ३८ वर्षांच्या संसारानंतर हरिश साळवे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २०२० मध्ये ब्रिटिश महिला कॅरोलिनसह हरीश साळवे विवाहबद्ध झाले होते. आता त्यांनी तिसरे लग्न केले आहे. ब्रिटनमध्ये हरिश साळवेंचा विवाह सोहळा पार पडला.

६८ वर्षीय हरिश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात. देशातल्या हायप्रोफाई खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात हरिश साळवेंनी बाजू मांडली आहे. टाटा समूहाचेही ते वकील आहेत. तसेच अभिनेता सलमान खानच्या हिट ॲण्ड रन प्रकरणातही त्यांनी सलमान खानची बाजू मांडली होती.नोव्हेंबर १९९९ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर म्हणून हरीश साळवे कार्यरत होते. त्यानंतर हरीश साळवे यांची नियुक्ती वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी राणी वकील म्हणून करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here