मुंबई / जळगाव : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. त्यांच्यावर तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातही त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहे.
शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात सकाळी केक कापून या कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी खा. ईश्वरलाल जैन, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आ. संतोष चौधरी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फारभाई मलिक, जिल्हा महिला अध्यक्षा कल्पनाताई पाटील, कल्पिता पाटील, मंगला पाटील, माजी आ. अरूण पाटील, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. मनिष जैन, संजय पवार, वाल्मिक पाटील, प्रा. डी.डी. बच्छाव, मधु पाटील आदींसह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यानंतर कांताई सभागृहात व्हॅर्च्युअल रॅलीचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी शरद पवारांसह गृहमंत्री अनिल देशमुख, ना. धनंजय मुंडे आदींनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, आज सकाळी ९ वाजता पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ८ हजार ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येत आहे. तर शेतकरी हिताच्या दृष्टीने ग्रामीण भागात विविध कार्यक्रम होत आहे.
दरम्यान शरद पवारांना सर्वशक्तिमान देव दीर्घायुष्य देवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभो, असंही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.