साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
अब्दुल करीम तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यातील हा आरोपी. त्याच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिले आहे. २००१ मध्ये तेलगीचा हजारो कोटी रूपयांचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर आता संजय सिंग यांच्या पुस्तकावर आधारीत ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज आली आणि अब्दुल करीम तेलगीचे नाव पुन्हा चर्चेत आले.
अब्दुल करीम तेलगीची कहाणी या सिरीजमधून मांडण्यात आली आहे. त्याचे वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे. अब्दुल तरुण होता तेव्हाच त्याचे वडील वारले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अब्दुलच्या खांद्यावर येऊन पडली. अब्दुलने उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम केली. फळविक्रेता म्हणून तेलगी काम करायचा. हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नड या चारही भाषा त्याला अवगत होत्या. खानापुरहून नोकरीसाठी मुंबईत आलेला तेलगी गल्फमध्ये गेला अन् पण तिथेही तो फारसा टिकला नाही. त्यानंतर तो मुंबईत परतला आणि नॉन इमिग्रेशनचे फेक स्टँप मारुन तो लोकाना गंडा घालू लागला अन् हळूहळू स्टॅम्प पेपरच्या कारभाराकडे त्याने आपला मोर्चा वळवला. तेलगीवर तो फेक पासपोर्ट बनवतो असाची आरोप होता. स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली. ३०० हून अधिक लोकांना कामावर ठेवले. या सगळ्यात जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा झाला होता. यावर सीरिजचे कथानक बेतलेले आहे. या सगळ्या घोटाळ्यात तेलगीला बऱ्याच बड्या राजकारण्यांचीही साथ होतीच. २००७ मध्ये तेलगीसह त्याच्या इतर सहकाऱ्यांवर खटला दाखल करून त्याला ३० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. याबरोबरच २०० कोटींचा दंडही तेलगीकडून वसुल करण्यात आला.