जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरासह जिल्ह्याभरातून विद्यार्थ्यी विद्यार्थिनींची शिक्षणासाठी येतात; परंतु त्यांना वेळेत पोहचण्यासाठी एसटी सुविधा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. हजारो विद्यार्थ्यी विद्यार्थिनींना शहरातून येण्यासाठी प्रचंड फरफट अवहेलना विद्यापीठात सुरू आहे.
जळगाव शहरातून येणार्या विद्यार्थ्यी विद्यार्थ्यीनींना तसेच त्यांच्या पालकांना साधी बसची सोय सुद्धा हे विद्यापीठ करू शकले नाही. एसटी बस हायवेला थांबतात तेथून किमान तीन किलोमीटर पायी चालत या विद्यापीठात यावे लागते. म्हणजे शिक्षणापेक्षा अधिक मेहनत जाण्या-येण्यात होत असल्यामुळे या विद्यार्थ्यांचा बराच वेळ आणि श्रम यामध्ये खर्च होतात. परंतु या विद्यापीठाच्या राक्षसी प्रशासनाला याची कुठलीही तमा नाही.
या विद्यापीठात येणार्यांवर रिक्षाचालकांची प्रचंड दादागिरी येथे दररोज पाहायला मिळते. आवाजवी भाडं एका एका रिक्षामध्ये १२ -१५ मुलां मुलींना कोंबुन जिवघेण्या महामार्गावर प्रवास करावा लागतो. यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मुलींची छेडखानी सुद्धा होते. परंतु शैक्षणिक गरजे मुळे अनेक मुली हा त्रास सहन करत आहेत.
हे विद्यापीठाच्या प्रशासनाला माहीत असताना सुद्धा प्रशासन डोळे झाक करीत आहे. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हे अतिशय सर्वसाधारण स्थितीतले असतात. त्यांना रिक्षाने ये-जा करायची म्हटली तरी मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र बस असल्यास त्यांना सवलतीच्या दरात आणि सुरक्षितपणे ये-जा करणे शक्य आहे. तथापि, अशी सुविधा अद्यापही उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात फरफट सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे. विद्यार्थ्यांची ओढाताण होत असून, यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल ते वाहन पकडून प्रवास करावा लागतो. महत्त्वाचा तास वाया जाऊ नये, यासाठी रिक्षाने प्रवास करत खिशाला भुर्दंड देत महाविद्यालय गाठावे लागते. हा पर्याय खर्चिक असल्याने रोज असा प्रवास करणे अनेक विद्यार्थ्यांना परवडत नाही.नवीन शैक्षणिक पिढी घडविणार्या या विद्यापीठाचे नाव कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, वाडी-वस्त्यांवर राहणार्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्याचे काम या विद्यापिठाकडून अपेक्षीत आहे.