साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
इंडिया आघाडीच्या गुरूवारी सुरू झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. जागावाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे.
इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल झाली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच अधिक भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाले. विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल. शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल. आघाडीत मतभेद होतील अशी कोणतीही कृती आता केली जाणार नाही. यामुळेच जागावाटपाच्या संवदेनशील मुद्द्याला आताच हात घातला जाणार नाही. पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, पंजाब या चार विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमधील जागावाटपाचा तिढा सोडविणे कठीण आहे. यामुळेच जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा केली जाईल. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांचा समाव्ोश असलेली समन्वय समिती नेमून त्या माध्यमातून विचारविनिमय करण्याची योजना आहे. विरोधकांची रणनीती काय असावी, भाजपच्या प्रचाराला कसे उत्तर द्यायचे, जास्तीत जास्त विरोधकांना एकत्र आणणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल काय म्हणाले ओमर अब्दुल्ला
एनडीएविरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसे होणार, संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाप्रणित एनडीए आगामी लोकसभा निवडणूकही विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात लढणार आहे. तर विरोधकांचा नेता कोण असणार? हे अद्याप ठरलेले नाही. इंडिया आघाडीतल्या नेत्यांना सातत्याने याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आलेला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले. याव्ोळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अब्दुल्ला यांना इिंडयाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल विचारले. त्यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल या गोष्टीची घोषणा करण्याची आत्ताच गरज आहे असे मला वाटत नाही. आधी निवडणूक होऊ द्या, बहुमत मिळू द्या, त्यानंतर निर्णय होईल.
देशाचा पैसा बाहेर पाठवला जात आहे, तो पैसा कोणाचा आहे?
पंतप्रधान मोदी गप्प का ?- राहुल गांधी यांचा सवाल
मुंबई ः राहुल गांधी यांनी विदेशातील वृत्तपत्रांचा हवाला देत अदानींच्या गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. अदानींच्या गुंतवणुकीसाठी पैसा कुणाचा आहे. एक व्यक्ती देशातील सर्व गोष्टी खरेदी करू लागला आहे. त्यावर मोदी गप्प का आहेत. सीबीआय, ईडी अदानींना प्रश्न का विचारत नाही. देशाचा पैसा बाहेर पाठवला जात आहे. ज्यांच्या माध्यमातून पैसे पाठवले जात आहेत, ते सर्व मोदींच्या जवळचे आहेत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. गांधी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, सेबीची चौकशी झाली. त्यांनी या प्रकरणात क्लीन चिट दिली. क्लीन चिट देणारे अधिकारी एनडीटीव्हीचे संचालक आहेत. हे सर्व मिळालेले लोक आहेत. शेअर बाजार फुगवला जात आहे. पैशाने मालमत्ता खरेदी केल्या जात आहेत. अदानी आणि मोदी यांचे नातं असल्याचे विदेशी वृत्तपत्रे सांगत आहेत. जी-20 शिखर परिषद भारताच्या प्रतिष्ठेची असल्याचे सांगितले जात आहे. भारतातून 1 अब्ज डॉलर्स बाहेर जात आहेत. यामुळे भारताची प्रतिमा खराब होत आहे. जेपीसी लागू करून अदानींची चौकशी का केली जात नाही, पंतप्रधान यावर का बोलत नाही. संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींचा महाराष्ट्र काँग्रेसला लाभ होईल?
मुंबई ः राहुल गांधी यांच्या या भेटीचा फायदा घेऊन आम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अर्ध्याहून अधिक जनतेला पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा संकटकाळात राज्यातील आणि केंद्रातील सरकार राजकारण खेळण्यात व्यग्र आहे. गॅस सििंलडरचे दर 700 रुपयांनी वाढवून, मग त्यात 200 रुपयांची कपात करणे ही शुद्ध फसवणूक आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने हे प्रश्न उपस्थित करणार आहोत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय का? हो, असा प्रयत्न नक्कीच होत आहे. बंगळुरू येथे इंडिया आघाडीची बैठक होत असताना एनडीए युतीने 38 पक्षांची बैठक घेतली. आमच्याकडे जास्तीत जास्त राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि ही संख्या वाढत चालली आहे. साहजिकच इंडिया आघाडीची एनडीला भीती वाटत आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही पटोले म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा नेते) यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद आहे, त्याप्रमाणे जागावाटप होईल. नरेंद्र मोदी सरकारला पराभूत करणे, हेच आमच्या आघाडीचे प्रमुख ध्येय आहे.