Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»भारतरत्न तेंडुलकर यांच्या ऑनलाईन जुगार जाहिरात विरोधात बच्चू कडूंचे आंदोलन
    मुंबई

    भारतरत्न तेंडुलकर यांच्या ऑनलाईन जुगार जाहिरात विरोधात बच्चू कडूंचे आंदोलन

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ः प्रतिनिधी

    प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर गुरूवारी आंदोलन केले. भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नसल्याचं सांगत पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन्‌‍‍ त्यातील पैसे तुम्हाला देतो, पण अशी जाहिरात करू नका, असे म्हणत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराबाहेरील परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
    क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगाराची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत सचिनने काम करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला होता. ऑनलाईन गेमिंंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरने एकतर ही जाहिरात सोडावी किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्याने परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतरही सचिनने कोणतंही पाऊल उचललेलं नव्हतं. अखेर आज बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
    आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले. तसेच याविषयी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवली असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परत करा-परत करा… भारतरत्न परत करा, आमचा देव जुगार खेळतो, अशा घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
    सचिन तेंडुलकरने ही जाहिरात सोडली नाही तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडुलकरला आणून देऊ. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करू की सचिनला चांगली बुद्धी दे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये, आमची एवढीच इच्छा आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.