जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत कालिंका माता मंदीर परिसरातील रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. काल सकाळी महापौर भारतीताई सोनवणे आणि उपमहापौर सुनिल खडके यांच्या हस्ते या कामास प्रारंभ झाला.स्थानिक नगरसेविका मिनाक्षी गोकुळ पाटील,रंजना विजय सोनार, नगरसेवक डॉ.विश्वनाथ खडके यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती कैलास सोनवणे, महिला बालकल्याण समिती सभापती रंजना भरत सपकाळे, विधी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत,कुंदन काळे आदींची यावेळी उपस्थिती होती. रस्ते डागडुजीच्या या कामांसाठी ४२ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असून काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय ते एस.टी. वर्कशॉप या १८ मीटर मार्गासह परिसरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती त्या अंतर्गत केली जाणार आहे.