पाचोरा : प्रतिनिधी
येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाची पाचोरा तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे एस.डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य गणेश देशमुख, कार्यवाह संजय पाटील, वाचनालय संघाचे व्यवस्थापक सागर भगुरे होते.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ प्रणित पाचोरा तालुका ग्रंथालय संघाची हुतात्मा स्मारक, पाचोरा येथे नुकतीच पुढील तीन वर्षासाठीची कार्यकारिणीची प्रथमतःच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश डी. पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन निवड
कार्यकारिणीत पाचोरा तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत प्रकाश पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष बाबुलाल तावडे (नांद्रा), सचिवपदी महेंद्रसिंग भिमसिंग राजपूत (गाळण), सहसचिवपदी अरुण विक्रम पाटील (मोंढाळा), कोषाध्यक्षपदी शशिकांत गोविंदा चंदिले (सांगवी), कार्याध्यक्षपदी भास्कर पाटील (सार्वे), कायदेशीर सल्लागार ॲड. चंदनसिंग अमरसिंग राजपूत तर सदस्यपदी महेंद्र वैदू परदेशी, जनार्दन चौधरी, विश्वनाथ वसंत पाटील, पृथ्वीराज देवसिंग परदेशी, शरद बाबुलाल पाटील, भैय्या पाटील घुसर्डी आदींना तालुकाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
मान्यवरांकडून नूतन कार्यकारिणीचे कौतुक
यावेळी जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष एस. डी. पाटील यांनी ग्रंथालयाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाचोरा तालुका ग्रंथालय संघाचे सर्व वाचनालयाचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते. निवडीचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, कार्याध्यक्ष दत्ता परदेशी, प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील आदी मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. यशवंत पाटील, सूत्रसंचालन महेंद्रसिंग राजपूत तर आभार गणेश देशमुख यांनी मानले.