जामनेरात इंधन दरवाढीविरुध्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एल्गार

0
18

जामनेर : प्रतिनिधी
सध्या देशासह जगात कोरोनाच्या महामारीचे संकट घोंगावत असतांना भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या महामारीत जनता भयभीत आहे. देशात सर्वच राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे आहे. अशा अवस्थेत जगणे मुश्किल झाले असतांना केंद्र सरकार मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी इधन दरवाढ करत मृत्यूच्या खाईत ढकलत असल्याची भावना जनमानसात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधन दरवाढीच्या विरुध्द राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निदर्शने व आंदोलने सुरु आहे. आज सकाळी जामनेर येथे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तहसिलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले.
कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपोळून निघत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमती कमी झाल्या असल्यावरही केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. केंद्राच्या या सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेल्या चुकीच्या धोरणाचा निषेध जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या निवेदनातून केला आहे.
निवेदन देतांना राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, राजेंद्र पाटील, अशोक चौधरी, विलास राजपूत, माधव चव्हाण, किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, जितेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील, प्रभु झाल्टे, संतोष झाल्टे, विशाल पाटील, राजू नाईक, विनोद माळी, अमोल पाटील, दिपक रिचवाल, नरु जंजाळ, डॉ. बाजीराव पाटील, सागर कुमावत, विशाल रोकडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना संदर्भात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here