जळगाव ः प्रतिनिधी
दिल्ली आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काल जळगांव मधील नॅशनल हायवे क्र ६ वरील इच्छादेवी परिसरातील रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर काल निदर्शने करण्यात आली
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी हे कायदे या बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठीच आणले असून रिलायन्स व अदानी सारख्या कंपन्या या मोदी धोरणांचे खरे सूत्रधार आहेत एकीकडे रिलायन्सच्या मालकीच्या न्यूज चॅनल्स वरून शेतकरी आंदोलनाची बदनामी करायची देशाला भ्रमित करायचे आणि दुसरीकडे स्वतः च्या फायद्याचे कायदे लोकांच्या माथी मारायचेत हे आता इथला शेतकरी सहन करणार नाही त्यामुळे केंद्राने दर्शवलेला प्रस्ताव नाकारत शेतीविरोधी ३ कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आता कुठलीही माघार नाही व त्यासाठी तीव्र आंदोलनासोबतच रिलायन्स सारख्या कंपन्यांवर बहिष्काराचे आवाहन ही करण्यात आले आहे.
त्याला प्रतिसाद देत रिलायन्स व अदाणीच्या इशार्यावर चालणार्या शासनाचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. या वेळी कार्पोरेट हटाव – किसान बचाव, कार्पोरेट को छूट और किसानोंकी लूट नही चलेगी ,
केंद्र सरकारकी मजबुरी – अंबानी, अदानी और जमाखोरी,यासारख्या घोषणा देण्यात आल्या.या निदर्शनांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे,,महाराष्ट्र जन क्रांतीचे मुकुंद सपकाळे,छावा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे,मणियार बिरादरीचे फारुख शेख , सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे,नियाज अली फौंडेशनचे अयाजअली नियाजअली, बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील,कादरिया फौंडेशनचे फारुख कादरी व एमआयएमचे जिया बागवान आदी संघटना प्रमुख व सहकारी सहभागी झाले होते.
यावेळी शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करा, रिलायन्स जियो समूहांच्या व्यवसायांवर बहिष्कार टाका असे आवाहन ही करण्यात आले