जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील रामानंद नगर भागातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संजय नामदेव झोपे यांचे कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाले. ते अनेक वर्षापासून रेशन दुकान चालवत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, अंत्योदय योजना,अन्नसुरक्षा योजना व व केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले होते मात्र त्यांना कोरोना झाल्याने ते आजारी पडले आणि त्यातय त्याचे निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांस शासनाने विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी मयत संजय झोपे यांचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.याप्रसंगी शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल, सुभाष जैन, हेमरत्न काळुंखे, फिरोज पठाण, प्रदीप देशमुख, नितिन सपके, नरेंद्र पाटील, रमजान मुलतानी,अतुल हराळ, हिमांशू तिवारी, शैलेश परदेशी, रिटाताई सपकाळे, संजय घुगे, हिम्मत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.