यावल ः प्रतिनिधी
अन्न व औषध मंत्री मा.राजेंद्र शिंगणे यांना दि.१७मे २०२१रोजी दिलेल्या निवेदनात यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की,ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसीलिझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूम मधून वितरित व्हायला पाहिजे जेणेकरून रुग्णांना वेळेवर वाजवी दरात औषधी मिळून रुग्णांच्या नातेवाईकांची फिराफिर/हेळसांड थांबेल.
दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की राज्यात कोविड संदर्भात औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे अशा वेळी आपण ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांच्यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन केले त्यामुळे पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली व रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये या निर्णयाचे कौतुकास्पद स्वागत करण्यात आले त्याच धर्तीवर जेव्हा कोरोनाचा रुग्ण सिरीयस होतो त्यावेळी त्याला हॉस्पिटल मधून दववारेटोसिलीझूमाव, इटोलीझुमाब, यूरिनॅट्रोपिन,म्यूकरमायकोसीए मध्ये अम्फोटेरिसिनबी अशी औषधे लिहून दिली जातात यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल होऊन शहरात, तालुक्यात,जिल्ह्यास्तरावर सर्व मेडिकल मध्ये ही औषधी शोधायला लागतात तसेच बर्याच वेळेला आपल्या परिचित लोकप्रतिनिधींना मागणी करीत असतात परंतु लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांची या औषधांबाबत मदत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि वेळेवर औषधी उपलब्ध न झाल्यामुळे बर्याच वेळेला रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे,अशा या परिस्थितीत काही मेडिकल दुकानांमध्ये औषधी उपलब्ध करून देण्यासाठी जास्त भावाने/ब्लॅक मध्ये औषधी विक्री होत असल्याच्या घटना सुद्धा उघडकीस आलेल्या आहेत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत यात गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होऊन तो होरपळला जात आहे,यावरून वचक निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आणि नियंत्रण होण्यासाठी सदर औषधी राज्य आणि जिल्हा नियंत्रण कक्षाकडे वर्ग करावी जेणेकरून चढ्या भावाने विक्री होत असलेल्या घटनांना आळा बसेल आणि रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध होईल असे दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.