सोयगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी जरंडी ग्रामपंचायत भाजपने राखली आहे. भाजपाच्या स्वाती पाटील यांची मंगळवारी, २२ रोजी दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी नाना मोरे यांनी केली.
राजकीय अस्तित्वात महत्वाची समजली जाणाऱ्या जरंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी अध्यासी अधिकारी नाना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच पदासाठी स्वाती पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे स्वाती पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभागृहात अकरा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते. दोन सदस्य अनुपस्थित राहिले होते. ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील हे सूचक होते. यावेळी सभागृहात तत्कालीन सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच स्वाती पाटील यांचा सत्कार करून पदभार देण्यात आला.
यावेळी सलमा तडवी, निलिमा पवार, वंदना पाटील, उपसरपंच संजय पाटील, लिला निकम, मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, द्वारका राठोड या सदस्यांची सभागृहात उपस्थिती होती. यावेळी नरेंद्र पाटील, एकनाथ चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, सुधीर पाटील, प्रकाश पवार, भिवा चव्हाण, कडूबा निकम, बनेखा तडवी, अमृत राठोड, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, दिलीप महाजन, कैलास माताडे, शिवाजी चौधरी आदींसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणूक प्रक्रियेसाठी सहायक म्हणून मंडळ अधिकारी मारोती धोंडकर, ग्रामसेवक गणेश सैवर, तलाठी अमित गंगावणे, संतोषकुमार पाटील, अनिल शिंदे आदींनी काम पाहिले.