Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»‘रास्ता रोको’ करणाऱ्या ६१ जणांवर गुन्हा
    यावल

    ‘रास्ता रोको’ करणाऱ्या ६१ जणांवर गुन्हा

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 22, 2023No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी
    चार चाकी आणि दूचाकी वाहनांचा आणि त्या वाहनांवरील नागरिकांचा रस्ता अडवून सर्वसामान्य नागरिक जनता तसेच ये-जा करणाऱ्या दूचाकी आणि चार चाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि यावल पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. सोमवारी, २१ रोजी यावल येथे भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन सकाळी ११:४५ वाजेपासून सुमारे साडेचार वाजेपर्यंत आंदोलन केल्याने आंदोलनाची परवानगी मागणार उस्मान रमजान तडवी (रा.सावखेडासीम, ता.यावल) यांच्यासह यावल तालुक्यातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही नागरिक यांच्यासह ६१ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई सुशील घुगे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.
    सोमवारी, २१ रोजी अर्जदार उस्मान रमजान तडवी यांनी शेखर सोपान पाटील यांनी सावखेडासीम येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत १४ ऑगस्ट रोजीपासून सुरु केलेल्या आमरण उपोषणाची अद्यापही दखल घेण्यासाठी कोणीही अधिकारी आलेले नाहीत. तसेच तालुक्यातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी समस्या ऐकून घेण्यासाठी येणार नाहीत, तोपर्यंत सोमवार रोजी ११ वाजता भुसावळ टी पॉईंट येथे रास्ता रोको करण्याचे ठरविले होते. त्याला परवानगी मिळावी म्हणून उस्मान रमजान तडवी यांच्यासह इतर ३२ जणांची स्वाक्षरी असलेला अर्ज यावल पोलीस स्टेशन येथे सादर केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव (गृह शाखा), क्र./दंडप्र/कावि/ २०२३/०२/५१९ दि. ७ ऑगस्ट २०२३ नुसार जळगाव जिल्ह्यात ७ ते २१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक व जमाव बंदी आदेश लागु असल्याने आदेशाच्या अधीन राहुन यावल पोलीस स्टेशन गोपनिय जा.क्र. ३५४/२०२३ दि. २० ऑगस्ट २०२३ अन्वये अर्जदार उस्मान रमजान तडवी यांना कलम १४९ सी.आर.पी.सी. नुसार नोटीस देण्यात आली होती. रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती.
    सोमवार रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास दिलेल्या कायदेशिर आदेशांकडे दुर्लक्ष करुन उस्मान रमजान तडवी त्यांच्यासह इतर १००-१५० स्री-पुरुष यांनी अचानक यावल शहरात अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रस्त्यावर भुसावळ टी पॉईंट येथे येऊन रास्ता रोको केला. सर्व सामान्य नागरिक तसेच ये-जा करणाऱ्या दूचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला.
    आंदोलनात अर्जदार उस्मान रमजान तडवी यांच्यासोबत पवन युवराज पाटील (रा. विरावली), हर्षल मिलींद महाजन, राहुल बडगुजर, संकेत निवृत्ती किरंगे (रा.सावखेडासीम), रोहन दिनेश महाजन, तुषार शिरीष पाटील, धिरज प्रभाकर पाटील (रा. माहित नाही), देविदास गोविंदा पाटील, निलेश प्रमोद महाजन, शाकीर मुबारक तडवी (रा.सावखेडा), अमोल प्रेमचंद पाटील (रा.माहित नाही), दीपक ज्ञानेश्वर चौधरी, गिरीष लिलाधर बर्ड, तुषार खुशाल पाटील, कोमल नरेंद्र पाटील (सावखेडासीम), सुयोग किरण पाटील (रा. माहीत नाही), ताहेर लतीफ तडवी, विशाल ज्ञानेश्वर पाटील, पराग प्रेमचंद पाटील, चंद्रकांत महाजन, गणेश शरद कोल्हे, पवन रामकृष्ण पाटील, वसंत राघो पाटील, अल्ताफ ईब्राहीम तडवी (रा.मुलींचे वसतीगृहाच्या, मनुदेवी मंदिराच्या मागे, यावल), गौरव भरत सोनवणे (रा. माहित नाही), रशीद रसुल तडवी, सलिम बिऱ्हाम तडवी, मुकुंदा शांताराम पाटील (रा. माहित नाही), किरण पाटील, वासुदेव पाटील (पूर्ण नाव, गाव माहित नाही), विकी पाटील, प्रभाकर नारायण सोनवणे (रा.वढोदा, ता.यावल), मुकेश पोपटराव येवले (रा. शिवाजीनगर, यावल), राकेश मुरलीधर कोलते (रा. महाजनगल्ली, यावल), कदीर खान करीम खान, (रा. काझीपुरा, यावल), अनिल जंजाळे (रा. सिद्धार्थनगर, यावल), संतोष बन्सी धोबी (यावल), बापु जासुद (रा. यावल), विक्की विजय गजरे (रा.यावल), अजय बाळु अडकमोल ( रा. दहिगाव, ता. यावल), विकास गणेश पाटील (रा.सांगवी खु।।, ता.यावल), अनिल प्रल्हाद पाटील (रा. कोळवद, ता. यावल), सुनील भालेराव (रा. सावखेडासिम), राजु महाजन, (रा. यावल), धिरज प्रेमचंद कुरकुरे (रा. सातोद, ता. यावल), उमेश जावळे, (रा. कोरपावली, ता.यावल), राजेश करांडे (रा.यावल), शरद रंगु कोळी (रा. यावल), कामराज रुपचंद घारु (रा. यावल), खुशाल दिलीप पाटील (रा. बोरावल गेट, यावल), इमरान पहिलवान (रा. यावल), चंद्रकांत जंगले (रा. चितोडा, ता.यावल), डॉ. विवेक अडकमोल (रा. बोरावल गेट, यावल), सुनील (पप्पु) जोशी (रा. शनि मंदिर, यावल), विलास तायडे (निळे निशाण, रा. यावल), ललीत पाटील (रा. दहिगाव, ता. यावल), रहेमान खाटीक (रा. खाटीकवाडा, यावल), नईम शेख (रा. यावल), कडु पाटील (चितोडा, ता. यावल), जितेंद्र वरडे (रा. सावखेडासिम, ता.यावल), रवींद्र पोलाद सोनवणे (रा. वढोदा, ता.यावल) यांनी अचानक यावल शहरात अंकलेश्वर ते ब-हाणपूर जाणाऱ्या रस्त्यावर भुसावळ टी पॉईंट येथे मध्यभागी थांबले. चारचाकी आणि दूचाकी वाहनांचा व त्या वाहनांवरील नागरिकांचा रस्ता अडवून सर्व सामान्य नागरिक तसेच वाहनांच्या वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेश निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरुध्द भादंवि कलम ३४१, १४३, १८८ मुंबई पोलीस ॲक्ट ३७ (१),(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.
    तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांसह माजी लोकप्रतिनिधींचा समावेश
    आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा प्रा.मुकेश येवले, यावल नगरपरिषद माजी प्रभारी अध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, उद्धव ठाकरे शिवसेना गटातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते तालुक्यासह शहरातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
    यावल पोलिसांची सहनशीलता कौतुकास्पद
    सोमवारी, २१ रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी ४ :४५ पर्यंत म्हणजे सुमारे पाच तास रास्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनामुळे यावल शहरातील व तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेला विद्यार्थ्यांना आपआपल्या लहान मोठ्या उद्योगात, व्यवसायात आणि दैनंदिन कामकाजात, कामधंद्यात आंदोलनामुळे सुमारे चार ते साडेचार तास एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत अडथळा निर्माण झाला. पोलिसांनाही सहनशीलता बाळगून बंदोबस्त चोख ठेवावा लागला. विरोधी व सत्ताधारी राजकारणातून पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या सहनशीलतेचा अंत संपूर्ण जनतेने बघितला होता. शेवटी गुन्हा दाखल झाल्याने यावल पोलिसांबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Yavala : जिनिंग प्रेस व्यापारी संकुलना समोरील रस्त्याची दुरावस्था

    December 24, 2025

    Yavala : बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

    December 24, 2025

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.