जळगाव : प्रतिनिधी
भगवान परशुराम हे शस्त्र आणि शास्त्राचे प्रतीक मानले जातात.त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त अजय डोहोळे यांनी प्रकाशित केलेला ब्रह्मदंड मासिकाचा विशेषांक ज्ञानवर्धक व संग्राह्य आहे असे ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी प्रतिपादन केले.
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे गादीपतींच्या हस्ते विशेषांकाचे ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.या वेळी संपादक अजय डोहोळे,श्रीराम महाराज जोशी, सुशांत नाईक व अनय डोहोळे यांची उपस्थिती होती.
ब्राह्मण डॉट कॉम परिवाराने २० वर्षाची परंपरा जोपासत भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या विशेषांकाचे सलग
१० व्या वर्षी प्रकाशन व विनामूल्य वितरणाचे सातत्य कायम राखले, तसेच कोरोनामुळे सामाजिक भान जपले असे मंगेश महाराज ह्या वेळी म्हणाले.
दरवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव शोभा यात्रेचा प्रारंभ होतो त्या ठिकाणी विशेषांकाचे प्रकाशन करावे. कोरोनामुळे वैद्यकीय, आर्थिक संकट सर्वांवर आले असल्यामुळे कोणतीही
जाहिरात अथवा आर्थिक सहकार्य न घेता ऑनलाईन पद्धतीने हजारो समाज बांधवांपर्यंत हा अंक विनामूल्य पाठवला जाणार असल्याची माहिती अजय डोहोळे यांनी दिली. या विशेषांकात भगवान श्री परशुरामाचे रंगीत छायाचित्र, जीवन चरित्र,त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत, मंदिराची व पुस्तकांची माहिती, स्तोत्र, आरत्या यांचा समावेश आहे.