Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील
    मुंबई

    शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 21, 2023Updated:August 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ः प्रतिनिधी

    माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवारांविषयी दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एक वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देतांना सारवासारव केली आहे.
    शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही असे आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिले नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत.ममता बॅनर्जी स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या,मायावतीही झाल्या होत्या मात्र शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते, असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. त्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे आता वळसे पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझे संपूर्ण भाषण जर ऐकले तर लक्षात येईल की, मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझे म्हणणे असे होते की, गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केले आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे आता दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    MPSC Exam Postponed : एमपीएससीची मोठी उलटफेर! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

    December 8, 2025

    Split in the Grand Alliance : भाजप-शिंदे गट संघर्षात वाढ; २ डिसेंबरच्यानंतर मोठी हालचाल?

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.