काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांचा पत्ता कट

0
13

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कांँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची घोषणा काल करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांंना आता वगळण्यात आले आहे तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश नव्या वर्किंग कमिटीत नसल्याचे दिसत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी थेट संगमनेरला आले होते.त्या निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांंच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत थोरात निष्ठेने पक्षासोबत राहिले. शिवाय थोरात हे गांधी परिवाराच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यावेळी संगमनेरमध्ये मुक्काम केला होता. थोरात यांना मोठी संधी मिळणार, हे तेव्हा बोलले गेले. पुढे तसेच झाले. बाळासाहेब थोरात यांना राज्यात तर संधी मिळालीच पण थोरात यांना पक्षाच्या राष्ट्रीय समितीवर घेण्यात आले होते.मधल्या काळात अनेक घडामोडी झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते स्थापन करण्यात थोरात यांचा मोठा सहभाग राहिला. पुढे ते सरकारही गेले
दरम्यान,विजयी झाल्यांनंतरही तांबे यांनी पुन्हा पक्षात येण्याचे टाळले आहे.उलट भाजपशी त्यांची सलगी कायम आहे.भाचे तांबे यांच्या या राजकीय डावपेचांचा फटका बाळासाहेब थोरात यांंना बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच त्यांना यावेळी वर्किंग कमिटीत स्थान मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीत अशोक चव्हाण,मुकुल वासनिक
श अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांँग्रेसने नेत्यांची तगडी टीम तयार केली आहे. कांँग्रेसने नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली असून यात देशभरातील एकूण ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या कार्यकारिणीचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी,माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, शशी थरूर यांंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक या दोन नेत्यांंचा समावेश करण्यात आला आहे.या शिवाय कार्यकारिणीत अधीर रंजन चौधरी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांचीही नावे आहेत. काँग्रेसच्या ३९ नेत्यांच्या नव्या कार्यकारिणीत अनेक युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात सचिन पायलट, चरणजीत सिंह चन्नी, कुमारी शैलजा, दीपेंद्र सिंह हुड्डा, गौरव गोगोई, रणदीप सिंह सुरजेवाला अशी काही नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here