रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का; लुना-२५ यान चंद्रावर कोसळले

0
16

मास्को ः वृत्तसंस्था

रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लुना-२५ हे यान चंंद्रावर कोसळलं आहे. लुना-२५ हे यान २१ ऑगस्टला चंंद्रावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार होते पण त्यापूर्वीच हे यान कोसळले आहे. रशियन अंतराळ संंशोधन संस्था रोस्कोसमॉसने ही माहिती दिली आहे.
जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-३ आणि रशियाची लुना-२५ यांचा समावेश होता. इस्रोच्या यानाने १४ जुलैला चंद्राकडे कूच केली होती. यानंतर २६ दिवसांंनी म्हणजेच १० ऑगस्टला रशियाच्या लुना-२५ यानाचे प्रक्षेपण झाले होते.चांद्रयान-३ हे २३ ऑगस्टला, तर दोन दिवस आधी २१ ऑगस्टला लुना-२५ हे यान चंद्रावर उतरणार होते.
२० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता मात्र इंजिनाचे प्रज्वलन झाले नसल्याची माहिती रशियाने जाहीर केली होती.यातच आता लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंंतराळ संस्थेने दिली
आहे.
२० ऑगस्टच्या रात्री लूना २५ हे कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल केला जाणार होता मात्र१ या इंजिनांचे योग्य प्रज्वलन झाले नसल्याचे दिसून आले आहे एवढीच प्राथमिक माहिती रशियाने प्रथम जाहिर केली.तेव्हा यानाने कक्षा अपेक्षेपेक्षा कमी बदलली का? चंद्रावर उतरण्याच्या वेळेत बदल केला जाणार का? यान भरकटले आहे का?वगैरे अशी कोणतीही माहिती जाहिर केली नाही. तेव्हा रशियाच्या लूना २५ मोहिमबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले मात्र नंतर
रशियन अंतराळ संंशोधन संस्था रोस्कोसमॉसनने लूना-२५ कोसळल्याचे घोषित केले आहे.असे असले तरी आत्तापर्यंत चंद्रावर तब्बल सात वेळा यान अलगद उतरण्यात रशियाने यश मिळवले असून तीन वेळा चंद्रावरील माती परत आणण्याचा पराक्रम रशियाच्या यानाने केला आहे. १९७६ नंतर लूना-२५ ही रशियाची पहिलीच मोहिम होती.
पाच दशकानंतर चांद्रयान मोहिम
दरम्यान, पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावर संंशोधन करत आहे. रशियाने १० ऑगस्ट १९७६ साली लुना-२५ हे यान पाठवले होते.पाच दशकाच्या कालावधीनंतर प्रथमच लुना-२५ हे यान पाठवण्यात आले आहे पण, रशियाच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आल्याचे दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here