जळगाव : प्रतिनिधी
क्रांतिसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ व्या जयंती निमित्त विविध राणाप्रेमीचा जळगाव शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी कोविड १९ चे नियमाचे पालन करून एकत्रित येवून श्री महाराणा प्रतापसिंह यांचे जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले.
शहरातील संघटनाच्या समन्वयाचे कार्य क्रांतीसुर्य बहुउद्देशिय मंडळ (पुतळा समिती) सर्व सामाजिक संघटनांच्या अनमोल सहकार्य घेवून समितीचे उपाध्यक्ष उदयसिंग जी.पाटील यांनी सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.राजूमामा भोळे व महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते गरजूंना शिधा वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते राणाप्रेमी महाराणा प्रतापसिंह प्रतिमेस अभिवादन करून तसेच रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संग्रामसिंह सुर्यवंशी, अतुलसिंह हाडा, विनोद शिंदे, दामोदर मोरे, मंगलसिंग पाटील, महेंद्रसिंग पाटील, दीपक राजपूत, विठ्ठल सिंह मोरे, चंद्रसिंग राजपूत, किरण राजपूत, सोनू राजपूत, गोकुळसिंह जाधव, सुरेशसिंह राजपूत, साहेबराव पाटील यांनी परिश्रम घेतले.