जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंदुर्णी येथील मूळ रहिवाशी व पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ . सागर गरुड आणि मित्र परीवाराने कोरोना रुग्णांना दोन्ही वेळेचा जेवणाचा मोफत डबा थेट रुग्णालयांमध्ये पोहचविण्याच्या सेवाकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील भुमीपुत्र असलेले डॉ . सागर गरुड यांचे पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल असुन तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करून ते सेवा देत आहेत. तसेच शेंदुर्णी येथे सुद्धा ते आरोग्य सेवा देत असतात, त्यांची आरोग्यसेवा संपुर्ण जिल्ह्याला परीचीत असुन गरीब गरजु रुग्णांसाठी ते देवदुत आहे .
जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर यासह इतर काही रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारार्थ दाखल होणार्या रुग्णांची संख्या सुद्धा त्यामुळे वाढत आहे .कोरोना बाधीत रुग्णांना उपजिल्हा रुगालयातील कोविड रुग्णालय व केअर सेंटर मध्ये शासन नियमानुसार जरी दोन वेळेचे जेवण – नास्ता मिळत असला तरी खाजगी रुग्णालया मध्ये मात्र रुग्णाला स्वतः ही व्यवस्था करावी लागत आहे . कोरोना रुग्णां सोबत काळजी घ्यायला आलेल्या नातेवाईकांची मात्र लॉकडाऊन मूळे सर्व हॉटेल्स बंद असल्यामुळे उपासमार होत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारी अडचण लक्षात घेता . आपण आपल्या जन्मभुमी जामनेर तालुक्याचे देणे लागतो आपण सुद्धा तालुक्यातील गरीब गरजु रुग्णांना काही तरी मदत करावी या हेतुने त्यांनी कोरोना रुग्णांना सकस आहाराच्या मोफत जेवणाचे डबे थेट रुग्णालयात पोहचविण्याचा सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे . ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे आहारा मुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये या उद्दात भावनेने त्यांनी हा सेवाभावी उपक्रम मित्र परीवाराच्या माध्यमातुन जामनेर शहरात सुरु केला आहे. जामनेर शहरातील कोणत्याही कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या गरजु रुग्णांना मोफत जेवणाच्या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यायचा असेल अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सकाळच्या डब्यासाठी १० वाजेच्या आत व संध्याकाळच्या डब्यासाठी ६ वाजेच्या आत संपर्क करण्याचे आवाहन सागर गरुड मित्र परिवारा तर्फे करण्यात आले आहे. यासाठी योगेश पाटील ( मो९५११२४४२४६/ ९७६३८०४१७ ) आणि विनोद पाटील (मो .७९७२०१२७२२/ ९४२३१६०५०२ ) या नंबर वर संपर्क साधावा .