यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलने दिली कायदेशीर लस

0
41

यावल ः प्रतिनिधी
यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतूकदारांनी विनापरवाना वाळू वाहतुकीची सर्रास तस्करी सुरू केल्याने गेल्या आठ दिवसांपासून यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बेधडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना २ ट्रॅक्टर आणि २ डम्पर पकडून पुढील कार्यवाही सुरू केल्याने वाळू वाहतूक दारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलकडून कायदेशीर लस टोचण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूकदारांचे मानसिक आर्थिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तसेच यावल पोलीस दुसरा कायदेशीर डोस अवैध वाळू वाहतूक दारांना केव्हा देणार? याकडे सुद्धा यावल तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे.
किनगाव मंडळ अधिकारी एस.टी.जगताप यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात १ ट्रॅक्टर, यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी यावल परिसरात १ ट्रॅक्टर, भालोद-बामणोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात १ डप्पर, साकळी मंडळ अधिकारी पी.ए.कडनोर यांनी त्यांच्या परिसरात एक डंपर असे एकूण २ ट्रॅक्टर आणि २ डंपर पकडून यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुढील दंडात्मक कारवाई सुरू असल्याने या प्रकरणात ८ ते १० लाख रुपये शासनाला महसूल मिळणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. या कारवाईची महसूल विभागाकडून पहिली कायदेशीर लस देण्यात आली.
त्याचप्रमाणे यावल पोलिसांकडून दुसरी कायदेशीर लस अवैध वाळू वाहतूकदारांना केव्हा मिळणार, याकडे सुद्धा संपूर्ण महसूल विभागासह यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here