जळगाव ः प्रतिनिधी
भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ, भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२१ तर्फे २१ ते २५ एप्रिल दरम्यान सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा सार्वजनिक कार्यक्रम न घेता ऑनलाइन हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ह्या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व डॉ. अमृता मुंडे हे उपस्थित होते.
अध्यक्ष दलीचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमर जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाल, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, हर्षाली पारख, विपीन चोरडीया हे परिश्रम घेत आहे.