जळगाव ः प्रतिनिधी
शहरात सध्या कोरोनामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा २५ गरजू कुटुंबांना रोटरॅक्ट जळगाव क्लबतर्फे आवश्यक किराणासह धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे सामान्य जनजीवन आणि कामकाज बंद आहे. त्यामुळे गरीब गरजूंना रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे गरजोपयोगी वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्यात आले. यात गरीब वस्तीमधील कुटुंबाना रोटरॅक्टतर्फे गहू, तांदूळ, साखर, तेल,चहा पावडर, मिरची, हळद वगैरे अशा वस्तूंचे किट तयार करणयात आले असून त्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जयवर्धन नेवे, आदित्य वाणी, पंकज जैन, तरुण अरतानी, पारस जैन यांनी परिश्रम घेतले.