जळगाव ः प्रतिनिधी
शिवसेना, युवाशक्ती फाऊंडेशन व युवा विकास फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय विकास संस्था संचलित सरदार वल्लभभाई पटेल क्वॉरंटाईन सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.
सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन आंबेडकर मार्केटजवळ, बी.एस.एन.एल. ऑफीसमागे जळगाव येथे ना नफा ना तोटा या तत्वावर ३० बेडेड क्वॉरंटाईन सेंटर सुरु करण्यात आले. सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, डॉ.ए.जी.भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा केमिस्ट अध्यक्ष
सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.किरण पाटील, ललित चौधरी, कुंदन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्हा केमिस्ट असोचे सहसचिव रुपेश चौधरी, दिनेश मालु, युवाशक्तीचे विराज कावडीया, अमित जगताप, ललित महाजन, महेंद्र पाटील, प्रा.सुरेश अत्तरदे, राजेश वारके, प्रा.योगेश महाजन, डॉ.निलेश पाटील, राजेश काळे, मनिष अत्तरदे, समीर गुळवे, उमाकांत जाधव, संदिप सुर्यवंशी, शांताराम पाटील, सचिन पाटील, प्रितम शिंदे, पियुष हसवाल, नवल गोपाळ, धिरज पाटील, योगेश अत्तरदे, गुणवंत पाटील आदींचे सहकार्य मिळत आहे.